पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी, भाविकांना पैठणकर यांच्या वतीने महाप्रसाद वाटप

Foto
पैठण, (प्रतिनिधी) :  आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री संत एकनाथ महाराज पालखी सोबत जाणार्‍या वारकरी भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे पैठणकरांच्यावतीने (भंडारा) महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यासाठी पोलीस पाटील अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंच कमिटी मार्फत हे नियोजन करण्यात येते. 

श्री संत एकनाथ महाराजांची पालखी गावातील निघून बाहेरील नाथ मंदिरात पोहोचते या ठिकाणी पालखी प्रमुख रघुनाथ महाराज पालखी वाले यांचे हस्ते पादुकांचे पूजन व महाआरती करून नैवेद्य दाखवण्यात येते. यानंतर पालखी प्रमुख रघुनाथ महाराज व इतर पुरोहितेच्या हस्ते भंडाऱ्याचे पूजन झाल्यानंतर वारकरी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येते.

यासाठी पैठणचे पोलीस पाटील अशोक पाटील,पंच कमिटीचे अध्यक्ष आसाराम ढवळे,काशिनाथ पठाडे,गोकुळ खांडेकर,धोंडीराम वाघे,माजी उपनगराध्यक्ष संभाजी सव्वाशे, रमेश लिंबोरे, बाबासाहेब ढवळे, कचरू साळुंके, धोंडीराम वाघे, रमेश जाधव, शंकर गोरे, विलास मोरे, ताराचंद चोरगे, गणेश शिंदे, जैनपुरा शिवशक्ती मंडळाचे अध्यक्ष सोनू जगताप, यासह लोणार गल्ली, कहार गल्ली, हमाल गल्ली या भागातील कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.